मु.का.अ.दिपा मुधोळ यांच्या सह मान्यवरांनी केला सत्कार
बुलडाणा, दि. 08 - जिल्ह्या परिषद मराठी प्राथमिक शाळा इस्लामपूर पंचायत समिती बुलडाणा येथील नवोपक्रमशील शिक्षिका डॉ मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे यांनी इंग्रजी भाषेची शब्द संपत्ती वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. या नवोपक्रमाला प्राथमिक गटातून जिल्ह्यास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. या मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्या हस्ते डॉ खोब्रागडे यांना सन्मनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमासाठी त्यांना प्राचार्य समाधान डूकरे यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी उपशिक्षणाधिकारी अकाळ, गटशिक्षणाधिकारी आंधळे व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी जिल्ह्या शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यवसायिक विकास संस्था बुलडाणा येथील सर्व अधिव्याख्याता व केंद्र प्रमुख यांची उपस्थिती होती. डॉ मंजुश्री खोब्रागडे ह्या उपक्रमशिल व आदर्श शिक्षिका असुन त्यांना या अगोदर सतत गैरहजर व अनियमित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण मानवी स्कुल बस तयार करून ‘स्कुल चले हम’ हि संकल्पना राबविली होती यामुळे शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी डॉ खोब्रागडे यांचा बुलडाणा येथील एका कार्यक्रमा दरम्यान गौरव सुध्दा केला होता. डॉ मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे ह्या लेखिका व उच्च विद्याविभुषित सेट-नेट, पीएच डी, सर्वोच्च पदवी प्राप्त जिल्ह्यापरिषद शाळेतील एकमेव शिक्षिका असुन त्यांना पती डॉ हर्षानंद खोब्रागडे सहाय्यक अध्यापक, शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबेजोगाई यांची समर्थ साथ व विशेष मार्गदर्शन लाभले आहे , डॉ मंजुश्री खोब्रागडे ह्या विविध शैक्षणिक कार्यामुळे महाराष्ट्र भरात सुपरिचित झाल्या असुन इतर शिक्षकांसाठी त्या आदर्श ठरल्या आहेत जर इतर शिक्षकांनी त्याचा आदर्श घेऊन शैक्षणिक कार्य प्रामाणिकपणे पार पाडले तर शिक्षण विभागात एक शैक्षणिक क्रांती घडुन येण्यास वेळ लागणार नाही येवढे मात्र नक्की.