कुकडीच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक 8 एप्रिल ला होणार ः आमदार राहुल जगताप
अहमदनगर, दि. 08 - कुकडी च्या आवर्तनाची सध्या मोठ्या प्रमाणात गरज आहे त्यामुळे तातडीने आवर्तन सोडण्यात यावे यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री व नगर चे पालक मंत्री राम शिंदे यांच्याकडे मागणी केली त्यामुळे दि 8 रोजी कुकडी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक बोलविण्यात अली असल्याची माहिती माजी मंत्री पाचपुते यांनी दिली .
सध्या पाण्याची तीव्रता वाढू लागली असल्यामुळे शेतकरी वर्गातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती त्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे शेतकर्यांनी पाण्याच्या आवर्तनाची मागणी केली होती त्यानुसार कल मंत्रालयात जाऊन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेऊन कुकडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली पण काही सद्श्यानी कुकडी कालवा सल्लगार समितीची बैठक घेऊन पाणी सोडावे असा मुद्दा मांडला त्यामुळे कुकडी कालवा सल्लगार समितीची बैठक दि 8 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती पाचपुते यांनी दिली . यावेळी पाचपुते म्हणाले सध्या कुकडी च्या लाभक्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणत गरज निर्माण झाली आहे त्यामुळे हे आवर्तन तातडीने सोडावे अशी आपण मंत्री महोदयांकडे मागणी केली आहे त्यानुसार 8 रोजीची बैठक होणार आहे पण या बैठकीत आपण आवर्तन लवकरात लवकर सोडावे अशी आग्रही मागणी करणार असल्याचे पाचपुते म्हणाले . तसेच कुकडीच्या आवर्तनातून पिण्याचे पाण्याचे जलश्रोत भरण्यासाठी जिल्हाधिकारी नगर यांचे पत्र आवश्यक होते त्यासाठी आपण स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पत्र घेतले व जलसंपदा विभागाकडे पाठविले असल्याचेही पाचपुते यांनी सांगीतले.