माती घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना क्लीन चिट
पाटणा, दि. 23 - बिहारमधील माती घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांना आज बिहार सरकारने क्लीन चिट केले आहे. संजय गांधी जैव उद्यानातील माती ही लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या मॉलमधून आणण्यात आली असल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. असा कोणताही घोटाळा झाला नाही, असे राज्याचे मुख्य सचिव अंजनी कुमार सिंग यांनी आज सांगितले.
मोदी यांनी यादव आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मोदी यांनी लालू यांच्या कुटुंबियांवर खोटे आरोप करून त्यांच्या कुटुंबियांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते शक्ती सिंग यांनी सांगितले .