सारोळा कासारच्या कुस्ती आखाड्यात नामवंत मल्लांची हजेरी
अहमदनगर, दि. 08 - सारोळा कासारचे ग्रामदैवत सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या हजरत निर्गुण शहावलीबाबांच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यास राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली.
गावातील ग्रामस्थ लोकवर्गणी जमा करून या मल्लांना इनाम दिले जातात. या वर्षीही यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नामवंत मल्लांनी आपले कुस्तीतील कसब दाखवत उपस्थित कुस्तीप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
यात्रा उत्सव समितीने सुमारे लाख रुपयांची बक्षिसे या कुस्तीगिरांना दिली. या आखाड्यात गावातील गुणवंत विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रांतील गुणवंत भूमिपुत्रांचा गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात्रोत्सव कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांच्यासह यात्रा कमेटीचे सदस्य ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.