Breaking News

युवकांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा आदर्श घ्यावा

। छत्रपती चौथे शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न 

अहमदनगर, दि. 08 - छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे जीवन युवकांनसाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. महाराजांनी अगदी कमी वयात इंग्रजांशी लढा दिला. कोल्हापूर संस्थानात शिस्त निर्माण केली. व रयतेचा राजा म्हणून त्यांची ओळख इंग्लंडच्या राणीपर्यंत होती. अशा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श युवकांनी घ्यावा, असे प्रतिपादन उपप्राचार्य दिलीप भिसे यांनी केले.
न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 154 वा जन्मोत्सव सोहळा समाधीस्थळी संपन्न झाला. यावेळी महाराजांच्या समाधी व पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक प्रा.विजय भंडारे, प्रा.संजय जाजगे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, लेखक प्रा.गणेश भगत, प्रा.शिवाजी लवंगे, प्रा. धनंजय लाटे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पर्यवेक्षक प्रा.विजय भंडारे यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच मसापा कार्यवाह, लेखक छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक प्रा.गणेश भगत यांनी यावेळी चौथे शिवाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनपट उलगडून दाखवला व महाराजांनी आपल्या रयतेसाठी कमी वयात किती संघर्ष केला या महाराजाांच्या संघर्ष गाथेचे दर्शन इतिहासप्रेमी विद्यार्थी व नगरकर यांना करुन दिला.
यावेळी चौथे शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ महाराजांच्या जय घोषात निनादत होते. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनंदा कर्पे, प्रा.आबासाहेब सोनवणे, प्रा.छाया नवले, प्रा.इंदूमती पुरनाळे, प्रा.साबळे, प्रा.उषा डाळिंबकर, व इतिहासप्रेमी, नगरकर आदिंनी उपस्थित राहून परिश्रम घेतले.  शेवटी प्रा.विजय भंडारे यांनी आभार मानले.