Breaking News

प्रथम, द्वितीय व तृत्तीय क्रमांकावर मालेगांव संघांचा कब्जा

खुली शुटिंग हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न...

बुलडाणा, दि. 08 - शहरात हॉलीबॉलपटु लक्ष्मण खैरे यांचे वाढदिवसाचे निमित्ताने दि 4 एप्रिल 2017 रोजी खुली शुटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लिंबारा स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत बाहेरगांवच्या 38 संघानी सहभाग नोंदविला तर मालेगांव येथील 3 संघानी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस पटकाविले दि 4 एप्रिल 2017 रोजी रात्री 9.00 पर्यंत सुरू होती. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.सुनिता रामदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुने म्हणुन आमदार डॉ.शशिकांत खेडेकर डॉ.रामप्रसाद शेळके, पी.आय.विजयसिंह राजपुत, दिपक बोरकर, गोविंदराव झोरे, हनिफशाह, अशोक चाटे, विजय देवउपाध्दे, मनोज कायंदे उपस्थित होते.
या बाबत सविस्तर असे की शहरात दरवर्षी बालाजी क्रिडा मंडळाचे वतीने खुली शुटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या वर्षी या मंडळाच्या सहकार्याने व हॉलीबॉल पटु लक्ष्मण खैरे यांचे वाढदिवसाचे निमित्ताने दि 4 एप्रिल रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मालेगांव, औरंगाबाद, वाशिम, बनोजा, सोनई, जालना, जळगांव येथील संघानी सहभाग घेतला स्पर्धेचे उदघाटन नगराध्यक्षा सौ.सुनिता रामदास शिंदे यांचे हस्ते हॉलीबॉल हवेत उंचावुन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.शशिकांत खेडेकर उपस्थित होते. स्पर्धेला रात्री 9.00 पासुन सुरूवात करण्यात आली. अनेक संघाने रोमहर्षक खेळ सादर केला तर मालेगांवच्या इस्तीभाग या संघाने सर्वांवर मात करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले तर नवाजवेन (खुशिद) मालेगांव यांनी व्दितीय तर आय.एस.सी संघ मालेगांव ने तृतीय क्रमांक पटकाविला याव्यतिरीक्त चतुर्थ बक्षिस जामनेर संघ पांचवा सवडद येथील संघाने पटकाविला पंच म्हणुन अशोक चाटे, प्रशांत तुल्के, काझी, गाडे महाराज यांनी काम बघीतले शहरातील व आसपासच्या पंचकोशीतील क्रिडा रसिकांकरिता या स्पर्धेने फार मोठी मेजवाणी मिळाली सतत 12 तास चाललेल्या या स्पर्धेने क्रिडा रसिकांच्या अंगावर रोमहर्षक खेळ सादर करीत शहारे आनुन सोडले.
स्पर्धा यशस्विते करीता लक्ष्मण खैरे(अण्णा), फय्याज टेलर, रफिक नाना (लकडीवाले), पठाण सर, बालाजी क्रिडा मंडळाचे  सर्व सदस्य गवई, मान्टे, खरात, अज्जु, जाहिर, नईम, बापु सिद्दीकी, अकिल पठाण, गजानन लांडगे, किरन केसापुरे, नंदु लोखंडे, कमलाकर जायभाये यांनी परिश्रम घेतले.