Breaking News

विश्‍व ज्ञानदिनानिमित्य जि.प. शाळेस संगणक भेट

बुलडाणा, दि. 20 - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वि जयंती मागील वर्षी युनोच्या 125 सदस्य राष्ट्रांनी  विश्‍व ज्ञान म्हणून साजरी केली . विश्‍व ज्ञान दिनाच्या निमित्ताने रामदास गुरव याच्याकडून   जि प शाळा निमगाव गुरू ई- लर्निंग  निमगाव गुरू चे माजी सरपंच सखाराम गुरव यांच्या हस्ते संपूर्ण संगणक संच भेट देण्यात आला . 
एकविसाव्या शतकाला संगणक युग म्हणून म्हटले जात असून विध्यार्थ्याच्या ज्ञान ग्रहणाच्या कक्षा रुंदावल्या असून पारंपरिक पद्धती कालबाह्य  ठरत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा  वापर अध्ययन- अध्यापनासाठी केला जाऊ लागला आहे  ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना  दर्जेदार शैक्षणिक अनुभुती मिळावी म्हणून अनेक गावांमध्ये जि प शाळा लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत  तशीच निमगाव गुरू मधील जि प शाळा  डिजिटल करण्यासाठी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून जि प शाळेचे माजी विध्यार्थ्या कडून संगणक संच भेट देण्यात आला .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री नागरे ,शिक्षक श्री सोनुने ,श्री म्हस्के, श्री वाकळे, कु सौदर , विठोबा चित्ते यांच्यासह दामोदर गुरव मल्हारी धारे, संतोष जाधव आदींची उपस्थिती होती.