Breaking News

इस्लाम आंतकवादाचा निप्पात करण्यास शिकवितो -कामरूजमा आझमी

महानगरात जमात ए अहले सुन्नत च्या वतीने आंतकवादावर व्याख्यान संपन्न

बुलडाणा, दि. 20 - सार्‍या जगाला इस्लाम हा शांतीचा संदेश देत आलेला आहे .इस्लाम हा शब्दच मुळी शांती या शब्दापासून बनला आहे .इस्लामचे प्रत्येक शब्द हे शांती दर्शवितात .दिन ए सलाम हे शांती ,तर खुदा चे नाव पण शांती या शब्दापासून बनले आहे .स्वर्ग हा दारुल सलाम आहे .अगदी मुस्लिम हा सलाम आलेकूम म्हणून नमस्कार करतो तो शब्द पण शांती दर्शवितो .यात कुठे आंतकवाद दिसतो.संपूर्ण इस्लाम व त्याची संपूर्ण शिकवण ही प्रेम ,बंधुभाव ,दया व क्षमेवर आधारित आहे. इतके असून सुद्धा इस्लामला आंतकवादाशी जोडून नाहक बदनाम केल्या जात यावर  चिंतन होणे हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जागतिक इस्लामी मिशन लंडन चे महासचिव अल्लामा कामरूजमा यांनी केले.
स्थानीय प्रमिलाताई ओक सभागृहात मंगळवारी मर्कज ए जमात ए अहले सुन्नत च्या वतीने आंतकवादा विरोधात इस्लाम या विषयावर कमरूजमा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .या व्याख्यानास नागरिकांनी एकच गर्दी केली .मुफ्ती अब्दुल रशीद साहेब करंजवी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या व्याख्यानास सुन्नी दावत ए इस्लाम मुंबईचे अमीर मौलाना शाकीर अली नुरी,सुनी दारुल कजा  अकोलाचे मो फारूक आदी उपस्थित होते.
अल्लामा आझमी पुढे म्हणाले ,सांप्रत व्यवस्थेत इस्लामला आंतकवादाशी जोड्ल्यागेल्यामुळेच हा न समजणारा धर्म बनत आहे .वास्तविक आंतकवादाला कुणी जन्माला घातले ही समजण्याएवढी जनता खुळी नाही.आंतकवादामुळे इस्लामी राष्ट्राचेच नुकसान जास्त होत आहे.यात ज्या संघटना कार्य करीत आहेत त्यांचा इस्लाम या शब्दाशी कुठलाच संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ठ केले.पवित्र कुराणात  मानवीय कल्याण व विश्‍व्बंधुत्वाच्या अनेक आयता लिहल्या आहेत .इस्लामने कधीच आंतकवादाचा पुरस्कार केला नाही.जर तुम्ही एखाद्याचे प्राण वाचविले तर जगातील संपूर्ण मानवजातीला वाचविल्याचे पुण्य इस्लामने निहित केले आहे . दुसर्‍याचा जीव घेणे हे महापातक मानल्या गेले आहे .सर्व जग हे त्या परमेश्‍वराने निर्माण केले असून प्रथम आदम व संपूर्ण मानवजात ही त्याची लेकरे असल्याचे इस्लाम मानतो .अर्थात आपण सर्व एकच कुटुंबाचे असून मग आंतकवादावर इस्लामचेचशिक्कामोर्तब का असा प्रश्‍न त्यांनी यावेळी उपस्थित केला .समाजाने यावर चिंतन करून इस्लामला नाहक बदनाम करण्याचे बंद करावे असे आहवान केले .
सर्वप्रथम पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला .यावेळी मुफ्ती अब्दुल रशीद यांनी देश्याच्या सलमातीसाठी दुवा म्हटली. अथितीचें  स्वागत मो फारूक ,शाहिद रिजवी ,मो. इम्रान चौहान ,फरहान खान यांनी केले .संचालन मो सोहेल कादरी तथा आभार मो गुलाम मुस्तफा यांनी मानलेत .यावेळी हाजी मुदाम , नगरसेवक साजिद खान पठाण ,मनोज गायकवाड ,सतीश ढगे  अयुब रब्बानी ,शम्स तबरेज खान ,शाहिद इकबाल ,मो फरान खान ,अनिस खान आडगाव, मो निसार , मो रिजवान ,मो समीर ,मो फरान,मो वसीम अटारी,अनावर खान ,जाहीर खान समवेत सुन्नी दारुल कजा बैतुल माल चे समस्त कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.