Breaking News

बाबा रामदेव यांच्या पंतजलीला मोठा झटका

नवी दिल्ली, दि. 24 - आर्मीच्या कँटीन स्टोर्स डिपार्टमेंटने योग गुरु रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या पतंजली आवळा जूसच्या विक्रीवर बंदी आणली आहे. सीएसडींनी म्हटलं आहे की, हा निर्णय प्रोडक्टच्या लॅबरेटरी रिसर्च नंतर घेतला गेला. 3 एप्रिल 2017 ला लिहिलेल्या एका पत्रात लिहिन्यात आलं की सर्व स्टॉकबाबत एक डेबिट नोट तयार करावी कारण ते प्रोडक्ट परत करण्यात येतील.
पतंजली आयुर्वेद सुरुवातीला जेव्हा बाजारात आलं तेव्हा या प्रोडक्टचाही त्यात समावेश होता. बाजारात आवला ज्यूसने कंपनीला भरपूर फायदा दिला. याची चौकशी करणार्‍या दोन अधिकार्‍यांनी म्हटलं की, कोलकात्याच्या सेंट्रल फूड लॅबरेटरीमध्ये याची टेस्ट झाली. निरीक्षणात ते आरोग्यासाठी योग्य नसल्याचं समोर आलं. पतंजलीने आर्मीच्या सर्व कँटीनमधून आवला ज्यूस परत घेतला आहे.