कुटुंबियांना त्रास देण्याकरिता सोनवणे यांनी गुंडांना प्रवृत्त केल्याचा घैसास यांचा आरोप
अहमदनगर, दि. 08 - खंडणी वसुल करण्यासाठी व कुटुंबीयांना त्रास देण्याकरिता आमी संघटनेचे अध्यक्ष सोनवणे यांनी गुंडांना प्रवृत्त केल्याचा आरोप महिला उद्योजिका सौ.प्रविणा घैसास यांनी केला असून, एमआयडीसी येथील मराठा चेंबर्सच्या सभागृहात जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांनी सोनवणे यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच या घटनेच्या पुराव्याच्या प्रती उपस्थित उद्योजकांना वाटण्यात आले. शाब्दिक चकमकीने सुंपुर्ण सभागृहात गोंधळ उडाला होता. पोलिसांना तातडीने पाचरण करण्यात आल्याने हा वाद तात्पुरता निवळला. या प्रकरणी सोनवणे यांच्या विरोधात घैसास यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला.
एमआयडिसी येथे प्रविणा घैसास यांची अनिप्रा केमिकल्स कंपनी आहे. सदर कंपनी बंद पाडण्याच्या उद्देशाने सोनवणे यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फुस लावून, घैसास यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर 2016 मध्ये घैसास यांना काही गुंडांनी कंपनी विरोधात खोटी तक्रार करण्याची धमकी देवून, 5 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. या खंडणीखोरांना पकडून घैसास व इतर महिलांनी चोप दिला होता. या प्रकरणाचा सखोल तपास घैसास यांनी केला असता, कंपनी बंद पाडण्यासाठी व कुटुंबीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सोनवणे यांनी गुंडांना 20 लाख रुपये दिले दिल्याचा आरोप घैसास यांनी केला आहे. या प्रकरणात खंडणीखोर व सोनवणे यांच्यात झालेल्या ई मेल व वॉट्सअप वरील संवादाचे पुरावे घैसास यांनी मिळवले आहे. एका महिला उद्योजिकास पदावर असलेले उद्योजक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल उपस्थित महिलांनी निषेध नोंदवला. तसेच या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार अशोक सोनवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रुपवते महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा वंदना थोरवे, सीमा आढाव, जया वालेकर, बबन खिळे, किरण बोरुडे आदिंसह प्रविणा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व अनिप्रा केमिकल्सचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.