विरोधकांना ईश्वर सुबुद्धी देवो, मुख्यमंत्री
मुंबई, दि. 08 - विरोधीपक्षांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकला, आजपर्यंत कितीही अटीतटीचे प्रसंग आले, पण विरोधीपक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकलेला नाही, यापुढे ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधकांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होती. पण त्यांनी चर्चेतून पळ काढला. निवडणुकीतील पराभवाने खचून गेलेल्या विरोधी पक्षांनी चर्चेतून पळवाट शोधली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.