कानिफनाथ समाधी मंदिर दर्शनासाठी यात्रा कालावधीत खुले ठेवा
अहमदनगर, दि. 08 - श्री क्षेत्र मढी येथील चैतं न्य कानीफनाथ यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेता गुढीपाडवा या एक दिवस खुले असणारे कानिफनाथ समाधी मंदीर यात्रा कालावधी दरम्याण 15 दिवस दर्शनासाठी खुले ठेवण्याची मागणी मढी ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळाला केली आहे .आज दि 5 याविषयावर विश्वस्तमंडळाची बैठक असुन काय निर्णय होतो याकडे भावीकास ग्रामस्तचे लक्ष लागले आहे भटक्याची पंढरी समजल्या जाणारी मढी यात्रा देशात प्रसिद्ध आहे विविध राज्याच्या कानाकोपर्यातुन भावीक यात्रेसाठी कानिफनाथदर्शनासाठी येतात . होळी ते गुढीपाडवा असी 15 दिवस यात्रा चालते संजवणी समाधीवर माथा टेकवुन स्वानंदी दर्शनाची अभीलाषा मनोरथ पुर्ण व्हावे यासाठी रंगपंचमी ते फुलोराबाग या मढी माहायात्राउत्सवात कीमाण 11 दिवस तरी गाभारा मंदीर खुले राहावे यासाठीची मागणी ग्रामस्थ व भावीक करत आहेत .वर्षभरातुन केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य समाधी मंदीर भावीकांना व मढी ग्रामस्तांना दर्शनासाठी खुले असते .दहा वर्षापुर्वी नित्यनियमाने समाधीमंदीर दर्शनासाठी भावीकांना खुले होते . मात्र मंदीराचे पावित्र जपण्यासाठी विश्वस्त मंडळ यांनी मंदीर दर्शन बंद करत नाथांच्या चांदीच्या पादुका मंदीराच्या प्रवेश द्वाराजवळ ठेऊन भावीकांना दर्शनाची सोय उपलब्ध केली .एकच दिवस समाधी मंदीर दर्शनासाठी खुले असल्यामुळे त्या दिवसाचे महत्व वाढले रंगपंचमीच्या दिवशी यात्रेत असणारी लाखो भावीकांची गर्दी परत गुढी पाडव्याच्या दिवशी होत आहे . मंदीरास दोनप्रवेश द्वार आहेत मुख्य प्रवेश द्वारातुन भावीक तर बाहेर पडणार्या दरवाज्यातुन ग्रामस्थ समाधी मंदीरात प्रेवेश करतात. यामुळे मंदीरात चेंगराचेगरीचे होते भावीक व ग्रामस्थामध्ये वादही होतात . याच गर्दीच्या कालावधीत व्हिआयपी भावीकांनाही दर्शनासाठी सोडवतांना व ग्रामस्तांना तोंड देता देता विश्ववस्त व कर्मचारी यांची गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी दमछाक होते .शासणाने जातपंचायतीवर बंदी घातल्यामुळे 15 दिवस चालणारी यात्रा अवघ्या तिन ते चार दिवसच चालत आहे .गोपाळ कोल्हांटी वैदु जोशी हे समाज बांधव पुर्वी दहा दिवस मढीयेथे राहत होते जात पंचायत बंद झाल्यामुळे समाज बांधव एका दिवसात बाहेरून दर्शन घेऊन निघुन जात आहेत . गुढीपाढव्याच्या दिवशी होणारी गर्दी चेंगराचेंगरी षष्ठी ते अमवस्या थंडवलेली यात्रा भरण्यासाठी व वाढती गर्दी लक्षात घेता मुख्य समाधी मंदीर रंगपंचमी ते गुढीपाडवा या कालावधीत खुले ठेवण्याची मागणी माजी सरपंच भगवाण मरकड शिवतेज विदयालयाचे समनवयक बाळासाहेब मरकड माजी अध्यक्ष दादासाहेब मरकड विष्णु मरकड विठ्ठल मरकड नवनाथ मरकड शंकर पाखरे साईनाथ मरकड माजी विश्वस्त उत्तम मरकड आदी ग्रामस्तांनी निवेदनाद्वारे केली आहे.