डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठा पतसंस्थेच्यावतीने अभिवादन
अहमदनगर, दि. 20 - मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतंस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 216 व्या जयंती निमित्त इंजि.विजयकुमार ठुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक विठ्ठलराव गुंजाळ, रमेश कराळे, झुंगाजी काळे, रामकृष्ण कर्डिले, बप्पासाहेब बोडखे, बबनराव सुपेकर, अशोक वारकड, विजय पाटील, महेश काकडे,रणजित रक्ताटे आदि सह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंजि.विजयकुमार ठुबेे म्हणाले की, 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस आपणा सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. विविध विषयांवरील त्यांचा अभ्यास अद्भूत असा होता. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कामगार आदिसह बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विविध क्षेत्रात केलेली कामगिरी अजोड अशी आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय शेतकरी आणि शेती याविषयी मूलभूत चिंतन केले. त्यांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक असून त्यातूनच त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. गुलामगिरीत खितपत पडलेल्या आणि अन्याय व अत्याचारांना बळी पडत असलेल्या भारतीयांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले.
भारतीय महिलांना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी त्यांनी बजावलेली कामगिरी मोलाची आहे. ते खर्या अर्थाने महिलांचे उद्धारकर्ते होते. यंदा शासनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेला लोकराज्य हा अंक अत्यंत महत्त्वाच्या माहितीने प्रकाशित करण्यात आला आहे.