सर्वांत जास्त उद्यानांची उभारणी करण्याचा संकल्प पूर्ण केल्याचे समाधान
। नगरसेवक अनिल बोरुडे यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 08 - यामागील काळात केलेल्या विकासकामांपेक्षा अधिक विकासकामे करून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. नगर शहरातील प्रभागांचा विचार करता माझ्या प्रभागात सर्वाधिक ओपन स्पेसचा विकास करून तेथे उद्यानांची उभारणी केली आहे. सर्वांत जास्त उद्यानांची उभारणी करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन नगरसेवक अनिल बोरुडे यांनी केले.प्रभाग 13 चे नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या प्रयत्नातून गुंजन कॉलनीत बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. बोरुडे बोलत होते. यावेळी अशोक कुलकर्णी, अशोक मुळे, श्याम शर्मा, प्रमोद डावरे, दत्ता गोरे, जयंत वैद्य, संदीप भंडारी, अशोक नवले, नामदेव शेजवळ, अशोक गाडेकर, संगीता देशपांडे, अथर्व देशपांडे, अनुपमा कुलकर्णी, उषा डावरे, खेडकर, छाया देशपांडे, यदुनाथ जोशी, सागर मुळे आदी उपस्थित होते.
बोरुडे पुढे म्हणाले की, नागरिकांनी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला निवडून दिलेले असते. त्यांचे प्रश्न सोडविण्याला नगरसेवकाने प्रथम प्राधान्य द्यायला हवे. ही संधी माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला सलग 3 वेळा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविल्यामुळेच त्यांनी वारंवार अधिक चांगले काम करण्याची संधी आपल्याला दिली, असे आपण मानतो, असे ते म्हणाले.
गोरे म्हणाले की, बोरुडे यांना प्रभागाचा इत्यंभूत अभ्यास असून, योग्य नियोजनामुळेच प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला आहे.