रिलायन्स जिओकडून समर सरप्राईज ऑफर मागे
मुंबई, दि. 07 - रिलायन्स जिओनं आपली समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे. त्यामुळे जिओच्या प्राईम मेंबर्सना मिळणारी तीन महिन्यांची वाढीव सेवाही आता ग्राहकांना घेता येणार नाही. ट्रायनं केलेल्या सूचनेनंतर जिओनं हा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून 31 मार्च 2017 पर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा पुरवली. 31 तारखेनंतर जिओच्या ग्राहकांना या सेवांसाठी पैसे मोजावे लागणार होते. मात्र जिओनं समर सरप्राईज ऑफर लॉन्च करत पुन्हा ग्राहकांना 3 महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा देण्यात येईल असं जाहीर केलं. यात 99 रुपये देऊन प्राईम मेंबरशिप घेणं बंधनकारक होतं. तसंच 303 रुपयांचं रिचार्ज 15 एप्रिलपर्यंत करणंही बंधनकारक करण्यात आलं होतं. ट्रायनं जिओला ही ऑफर मागे घेण्याची सूचना केल्यानंतर रिलायन्सकडून ही योजना मागे घेण्यात आली आहे. मात्र कंपनीनं यापूर्वीच ऑफर समर सरप्राईज ऑफर घेतलेल्या ग्राहकांना पुढील 3 महिने जिओकडून मोफत सेवा मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे यापुढे समर सरप्राईज योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही.