Breaking News

जीवनात आनंद व समाधान निर्माण होण्यासाठी परमेश्‍वराच्या चिंतनाची आवश्यकता - सुवर्णा कोतकर

अहमदनगर, दि. 03 - धकाधकीच्या जीवनात एकमेकांसाठी वेळ नसल्याने, मनुष्याचे जीवन तणावपुर्ण बनले आहे. जीवनात आनंद व समाधान निर्माण होण्यासाठी परमेश्‍वराच्या चिंतनाची आवश्यकता आहे. हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्‍वरी पारायण, किर्तन आदि धार्मिक कार्यक्रमाने परमेश्‍वराचे चिंतन होवून धार्मिकता वाढते व संस्काराची रुजवण होत असल्याचे मत माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी व्यक्त केले. तसेच जगदंबा तरुण मंडळ व ग्रुपच्या वतीने चालू असलेल्या सामाजिक व धार्मिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.
केडगाव येथील रेणुका माता मंदिर परिसरात जगदंबा तरुण मंडळ ट्रस्ट व जगदंबा ग्रुपच्या वतीने आयोजित रेणुका माता अखंड हरीनाम सप्ताहाच्या उद्घाटना प्रसंगी सौ.कोतकर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुनिल कोतकर, मार्केट कमिटीचे सभापती विलास शिंदे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, एकनाथ कोतकर, अशोक कराळे, ह.भ.प. क्षीरसागर महाराज, प्रसाद आंधळे, शिर्के, वडे, जाधव महाराज, लक्ष्मीकांत घोडके, आबा लोंढे आदिंसह भाविक व मंडळाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते वीणा व तुलसीपूजन करुन दीपप्रज्वलनाने सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी मनोगत व्यक्त करुन, मंडळाच्या युवकांना सामाजिक व धार्मिक कार्यास सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैभव कदम यांनी केले. उपस्थितांचे आभार इंजि. प्रसाद आंधळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बच्चन कोतकर, राघु ठुबे, भागीनाथ कोतकर, भैरु कोतकर, सोमा कोतकर, महेश कोतकर, सचिन ठुबे, संतोष कोतकर, नवनाथ कोतकर, नाथा कोतकर, निलेश कोतकर, सुरेश झारेकर, किशोर कोतकर, सागर शिरोळे, शरद ठुबे, बाबा कोतकर, प्रशांत ठुबे, गणेश ठुबे आदि परिश्रम घेत आहे.
या सप्ताहात ह.भ.प. संतोष बोरुडे महाराज, सोनाजी शिंदे महाराज, बोरकताई, रामदास क्षीरसागर महाराज, शिवाजी जाधव महाराज, श्रावण वाघमोडे महाराज यांचे प्रवचण होणार आहे. तसेच ह.भ.प. उत्तम चव्हाण महाराज, अनिल गरड महाराज, गोपाळेताई, महंत स्वप्निल पवार महाराज, द्यानंद कोरेगावकर महाराज, गुलाब करंजुले महाराज, रामगिरी महाराज किर्तन सादर करणार आहे. बुधवार दि.8 मार्च रोजी सायंकाळी 4 वा. भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 9 वा. नाशिक येथील भारुड सम्राट राजेंद्र महाराज काळे, डॉ.प्रल्हाद गुंजाळ व जयेत महाल यांचा भारुडचा कार्यक्रम रंगणार आहे.