Breaking News

इशांत, जाडेजाचे कांगारुंना दणके

रांची, दि. 20 - रांची कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे. उपहारापूर्वी इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाला दोन दणके दिल्याने, ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 63 अशी झाली.
आधी इशांत शर्माने सलामीवीर मॅट रेनशॉला पायचीत केलं. मग कर्णधार स्मिथच्या त्रिफळा उडवून जाडेजाने मोठा अडथळा दूर केला. रेनशॉने 44  तर स्मिथने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने आज काच्या 2 बाद 23 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रेनशॉ आणि स्मिथने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हलती ठेवली. भारताची आघाडी कमी करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र इशांतने भेदक गोलंदाजी करत रेनशॉला तंबूत धाडलं. मग पुढच्याच षटकात जाडेजाने कर्णधार स्मिथचा काटा काढला. त्यापूर्वी कालच्या चौथ्या दिवशी जाडेजाने डेव्हिड वॉर्नर आणि नाईट वॉचमन नॅथन लायनला तंबूत धाडलं होतं.