आमचे सर्व आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ: तटकरे
मुंबई, दि. 24 - ‘आमचे कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नाही. सर्व आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत. तरीही भाजपचा तसा दावा असेल तर त्यांना तो लखलाभ असो.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
काही वेळापूर्वीच भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यावेळी मध्यावध्यी निवडणुका किंवा काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आणणं या दोन पर्यायांवर चर्चा झाली. त्यासंबंधी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘आमचे कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नाही. सर्व आमदार हे शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे असं जर कुणी म्हणत असेल तर ती अफवा आहे.’
दरम्यान, आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशी महिती सुत्रांनी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या कायम असणार्या विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यासंबंधी दोन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.