Breaking News

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटला भारतीय नागरिकत्व

मुंबई, दि. 23 - ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शॉन टेटला 19 मार्च रोजी भारतीय नागरिकत्व मिळालं आहे. त्याने ट्विटरद्वारे आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याची माहिती दिली. शॉन टेटने 2011 साली आंतरराष्ट्रीय वन डे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचं प्रतिनिधित्व करतो.
शॉन टेटने भारताविषयीचं त्याचं प्रेम नेहमीच बोलून दाखवलं आहे. शिवाय त्याने 2014 मध्ये भारतीय वंशाची मॉडेल माशुम सिंघासोबत लग्नही केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये शॉन टेटने 35 सामन्यांमध्ये 62 विकेट घेतल्या आहेत. तर 3 कसोटी सामन्यांमध्ये 5 विकेट त्याच्या नावावर आहेत. शिवाय 171 टी-20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 218 विकेट आहेत.