सालगाव येथे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
पुणे, दि. 16 - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव (ता. आंबेगाव) अधिनस्त सालगांव (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिसभरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी 1 एप्रिल 2017 पासून प्रशिक्षण सत्राचे आयोजन सुरु करण्यात येणार असून इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर.आर. सोनकवडे यांनी केले आहे.
या केंद्रात अनुसूचित जमातीच्या 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पोलीसदल व सैन्यदलात भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण 4 महिन्यांचे (एकूण 120 दिवसाचे) आहे. प्रशिक्षणादरम्यान मोफत निवासाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनूसूचित जमातीचा असावा, उमेदवारास अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला सक्षम अधिकार्यांने दिलेला असावा, उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे, उमेदवाराची उंची किमान 168 से.मी. (5 फूट 5 इंच पेक्षा जास्त) असावी. उमेदवाराने प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे तसेच अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02133-244266 किंवा 02133-244277 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. याचा फायदा जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी घ्यावा, असेही प्रकल्प अधिकार्यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.