Breaking News

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात पाकचा आणखी एक क्रिकेटपटू निलंबित

इस्लामाबाद, दि. 18 - स्पॉट फिक्सिंगप्रकरणात पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटर निलंबित करण्यात आला आहे. पाकिस्तान सुपर लीगमधल्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणात निलंबित करण्यात आलेला शाहझेब हसन हा चौथा क्रिकेटर ठरला आहे.
या प्रकरणात शाहझेब हसनवर आरोपपत्रही ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या नोटिशीला 14  दिवसांमध्ये उत्तर देणं शाहझेबला बंधनकारक आहे. या प्रकरणात आधी शर्जिल खान, खालिद लतिफ आणि मोहम्मद इरफान या तिघांना निलंबित करण्यात आलं  आहे.