Breaking News

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी रांची सज्ज

रांची, दि. 16 - बंगळुरू कसोटीतल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेली टीम इंडिया आजपासून (गुरुवार) तिसर्‍या कसोटीच्या आव्हानाला सामोरी जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली ही तिसरी कसोटी रांचीच्या मैदानात खेळवण्यात येईल.
पुणे आणि बंगळुरूच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांच्या पार्श्‍वभूमीवर रांचीच्या तिसर्‍या कसोटीतही खेळपट्टीची भूमिका आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू राहील.  आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी पुण्याची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची होती, असा शेरा आपल्या अहवालात दिला होता. त्यापाठोपाठ बंगळुरूची खेळपट्टीही  दर्जाहीन असल्याचा शेरा त्यांनी दिला. या दोन्ही खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रांचीची खेळपट्टीही फिरकी गोलंदाजांना अनुकूल  ठरण्याचा अंदाज आहे. यजमान झारखंड क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मात्र ही कसोटी पाच दिवस चालेल, या मुद्यावर ठाम आहेत.