Breaking News

भोसरीत बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणारा गजाआड

पुणे, दि. 21 - बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकाला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई रविवारी (दि.19) रात्री दहाच्या सुमारास हुतात्मा चौक, आळंदी रोड येथे करण्यात आली.
रमजान मशाक कुरणे (रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भोसरी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. रमजान हा आळंदी रोड येथील हुतात्मा चौकात बेकायदेशीररित्या गावठी घेऊन थांबला होता. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून एक देशी गावठी कठ्ठा आणि दोन जिवंत काडतूसे असा 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे आयुक्तलयाच्या हद्दीत 11 ते 24 मार्चपर्यंत शस्त्र बाळगण्यास बंदी आहे. भोसरी ठाण्याचे पोलीस हवालदार एन.पी.पाटील तपास करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, अशोक गवारी, पोलीस हवालदार नुरमंहमद पाटील, पोलीस नाईक विपुल जाधव, संदीप गवारी, पोलीस शिपाई बाळा विधाते, विनायक मसकर, गणेश हिंगे यांच्या पथकाने केली.