कोणत्याही मंत्र्यांनं लाल दिव्याची गाडी वापरु नये: योगी आदित्यनाथ
नवी दिल्ली, दि. 21 - उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शपथविधीनंतर तात्काळ कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री योगींनी स्पष्ट केलं आहे की, ‘कोणतेही मंत्री लाल दिव्याची गाडी वापरणार नाही.’ एवढंच नव्हे तर मंत्री आणि अधिकार्यांनी आपली संपत्ती 15 दिवसात जाहीर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
शपथविधीनंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठका घेणं सुरु केलं. आज त्यांनी उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा केली. उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी तसेच अफवा पसरवणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिेले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सचिवांशी देखील चर्चा केली. दरम्यान, आजपासून योगी आदित्यनाथ यांनी आपला मुक्काम आजपासून मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय बंगल्यात हलवला आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच योगी आदित्यनाथ यांनी पाच गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आदित्यनाथ यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना 15 दिवसात संपत्तीचा तपशील देण्यास सांगितलं आहे. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यातील गोष्टी अजेंड्यावर असतील, असंही स्पष्ट केलं.