8 देशातील नागरिकांना विमानात लॅपटॉपवर बंदी, अमेरिका, ब्रिटनचा निर्णय
वॉशिंग्टन, दि. 22 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन फतवा काढला आहे. आठ मुस्लीमबहुल देशातून अमेरिकेत जाणार्या प्रवाशांना विमानात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेसोबतच ब्रिटननेही हा निर्णय घेतला आहे. मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय कोर्टाने रद्द केल्यानंतर ट्रम्प यांनी नवा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 8 मुस्लीमबहुल देशातील 10 विमानतळांहून अमेरिकेत जाणार्या प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक उपकरणं लगेजमध्ये ठेवता येणार नाहीत. लॅपटॉप, टॅबलेट, कॅमेरा, किंडल आणि आयपॅड या उपकरणांवर प्रवासात बंदी घालण्यात आली आहे.
इजिप्तमधील कायरो विमानतळ, संयुक्त अरब अमीरातमधील दुबई आणि अबू धाबी विमानतळ, तुर्कीतील इस्तांबूल विमानतळ, कतरमधील दोहा, जॉर्डनमधील अम्मान, कुवैत, मोरक्कोतील कॅसाब्लांका, सौदी अरेबियामधील जेद्दा आणि रियाध विमानतळाहून अमेरिकेत जाताना इलेक्ट्रॉनिक उपकरणं प्रवासात बाळगता येणार नाहीत. अमेरिकेनंतर ब्रिटननेही हा निर्णय घेतला आहे. तुर्की, लेबनान, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया आणि सौदी अरेबिया या सहा देशातील नागरिकांना ब्रिटनमध्ये जाताना विमान प्रवासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं नेता येणार नाहीत.