रांची कसोटीत भारताला विजयाची संधी, कांगारुंवर 129 धावांची आघाडी
रांची, दि. 20 - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी चौथ्या दिवसअखेर मोठ्या नाट्यमय वळणावर उभी आहे. या कसोटीत टीम इंडियानं आपला पहिला डाव नऊ बाद 603 या धावसंख्येवर घोषित करून, 152 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा काटा काढून चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दोन बाद 23 अशी बिकट अवस्था केली आहे.
भारताच्या हाताशी अजूनही 129 धावांची आघाडी असून, या कसोटीत टीम इंडियाला सनसनाटी विजय मिळवण्याची संधी आहे. भारतीय संघाला रांची कसोटीवर वर्चस्व मिळवून दिलं ते पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं.
चेतेश्वर पुजाराचं द्विशतक, रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत नऊ बाद 603 या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती. पुजारानं 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकारासह 117 धावांची खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 55 धावा ठोकून भारतीय डावाला गती दिली.
पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागिदारीनं भारतीय डावाला मजबुती दिली. पुजारानं 525 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी उभारली. त्याचं हे कसोटी कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक ठरलं.