जेजुरी -खंडोबा गडावरील स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप प्रक्रिया पूर्ण
पुणे, दि. 26 - महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावरील त्रेलोकीचे दर्शन घेण्याकरिता शुक्रवारपासून दीड लाख भाविकांनी गर्दी केली होती
यावेळी मार्तंड देवसंस्थानच्या वतीने भाविकांसाठी महा शिवरात्रीउत्सवानिमित्त फराळाची सोय करण्यात आली होती तर दुसर्या दिवशी उपवास सोडण्याकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मल्हारगड परिसराला विद्युतरोषणाई,तसेच मंदिर परिसर फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता.
खंडोबा मंदिराच्या मुख्य कळस शिखरामध्ये तर मुख्य मंदिरातील गाभा-यातील गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग असून ही दोन्ही शिवलिंगे फक्त शिवरात्रीलाच उघडली जातात.विधिवत पूजा -अभिषेक केल्यानंतर भाविकांना दशर्नासाठी खुली केली जातात.दोन दिवसानंतर पुन्हा धार्मिकविधी करीत बंद केली जातात.यंदा दोन्ही शिवलिंगे खुली केल्यानंतर शनिवारी (दि.25 )सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या हस्ते धार्मिक विधी केल्यानंतर गर्भगृहातील पाताळलोकीच्या शिवलिंगाच्या वज्रलेप (लूकन )प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.दुपारी 2 वाजण्याचे दरम्यान ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा वेदमूर्ती सेवेकरी यांचे हस्ते शिवलिंगामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी प्रमुख विश्वस्त संदीप घोणे ,विश्वस्त सुधीर गोडसे ,किशोर म्हस्के प्रमुख वतनदार -इनामदार राजेंद्र पेशवे ,खांदेकरी -मानकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे ,माजी नगरसेवक मेहबूब पानसरे ,पुजारी ,सेवेकरी ,देवसंस्थान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गडकोटातील पंचलीगेश्वर ,भांडारगृहातील शिवलिंगाला सुद्धा वज्रलेप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.महाशिवरात्री निमित्त देवसंस्थानच्या वतीने देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आली होती आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.