Breaking News

प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचं निधन

अहमदाबाद, दि. 01 - प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अहमदाबादमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. तारक मेहता यांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मेडिकल कॉलेजसाठी देहदान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
तारक मेहता यांनी स्तंभलेखक, विनोदी लेखक, नाटककार होते. सरकारने 2015 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ‘पद्मश्री’ तारक मेहता यांनी ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकासाठी मार्च 1971 पासून ‘दुनिया ना उंधा चश्मा’ नावाचं स्तंभलेखन केलं होतं. सब टीव्ही प्रसारित होणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका त्यावरच आधारित आहे.