Breaking News

राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेक, सोलापूर एमआयएम शहराध्यक्षाला अटक

सोलापूर, दि. 27 -  सोलापूर एमआयएमच्या शहराध्यक्ष तौफिक शेखला पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप तौफिक शेखवर आहे. 19 फेब्रुवारीला सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील उमेदवार हरुण सय्यद यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती.
सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमकडून पतंगाच्या चिन्हावर तौफिक शेख निवडून आला आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एमआयएम प्रचार रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एमआयएमनं केला होता. निवडणुकीच्या आदल्या दिवशी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक केली, असा आरोप करत राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.