महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती
मुंबई, दि. 01 - महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून सुमित मलिक यांनी पदभार स्वीकारला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून मलिक यांनी कार्यभार हाती घेतला. स्वाधीन क्षत्रिय 31 जानेवारीलाच सेवानिवृत्त झाले. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.
नवीन नियुक्त झालेले सुमित मलिक हे 1982 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवपदाचा अतिरिक्त भार होता. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.