युवीने कॅन्सरला हरवलं होतं, आज फक्त इंग्लंडला हरवलं : सेहवाग
नवी दिल्ली, दि. 20 - टीम इंडियाने कटकच्या दुसर्या वन डेत इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीने वैयक्तिक शतकांसह चौथ्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी रचून या सामन्यात भारताला सहा बाद 381 धावांची मजल मारून दिली होती.
टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने या सामन्यातील युवराजच्या खेळीचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. युवराजने कॅन्सरला हरवलं होतं, आज तर फक्त इग्लंडला हरवलंय. त्याच्याकडून सर्वांनी काही तरी शिकायला पाहिजे, युवी तुझा अभिमान वाटतो, असं वीरुने म्हटलं आहे. टीम इंडियाची या सामन्यात 27/3 अशी डळमळीत अवस्था झाली होती. त्यानंतर आलेल्या युवीने इनिंग सावरत मोठी खेळी केली. त्याने 127 चेंडूंमध्ये तब्बल 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 150 धावा ठोकल्या.