पाकची गरिबी दूर झाल्यास भारताबरोबरचे शत्रुत्व संपुष्टात येईल ः बाबा रामदेव
पुणे, दि. 20 - पाकिस्तानमधील गरिबी दूर झाल्यास भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व कायमचे संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तान भारताशी युद्धाचा विचार करणार नाही, असे विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. बाबा रामदेव गुरूवारी पुण्यात सुरू असलेल्या 7व्या छात्र संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पतंजली समुहाच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले.
पतंजली समूह नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिकेमध्ये योगाचा आणि व्यवसायाचा विस्तार करणार आहे. त्यातून मिळणारा नफा गरीबांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच पाकिस्तानमध्येही पतंजली समूहाचा विस्तार करण्याची आमची योजना आहे. आतापर्यंत समूहाने एक लाख लोकांना रोजगार दिला आहे. मी मुसलमानाकडे पाहिल्यास तेव्हा मला त्याच्यात आपलेच रक्त असल्याचे दिसते, असे बाबा रामदेव यांनी सांगितले. यावेळी बाबा रामदेव म्हणाले की, परकीय कंपन्या भारतात एक रूपयाची गुंतवणूक करतात आणि 100 रूपये घेऊन जातात. या कंपन्या देशातील कोणत्याही विकासकामांना मदत करत नाहीत. या कंपन्यांमुळे लाखो कोटी रूपये देशाबाहेर जात आहे. मात्र, नोटाबंदीनंतर देशात 18 लाख कोटी आले, असा दावा बाबा रामदेव यांनी केला. तसेच आगामी वर्षात पतंजली समूहाची उलाढाल 10 हजार कोटीपर्यंत, तर येत्या पाच वर्षात ही उलाढाल एक लाख कोटीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, आम्ही तंबाखू किंवा दारू उत्पादन करणार्या कंपनीकडून देणगी स्वीकारत नाही, असे त्यांनी सांगितले.