सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला!
जोधपूर, दि. 18 - जोधपूर कोर्टाने अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा दिला आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणाच्या खटल्यातून सलमान सुटला आहे. 18 वर्षांनी हा निकाल आला आहे. काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.
जर सलमानवर आरोप सिद्ध झाले असते, तर त्याला 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ झाली असती. 18 वर्ष जुन्या केससाठी सलमान जोधपुरात दाखल झाला आहे. 1998 साली ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर करण्यात आला आहे. 9 जानेवारीला कोर्टासमोर हे प्रकरण सादर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.