सुषमा स्वराजवर किडनी प्रत्यारोपण करणारे डॉक्टर पद्मचे मानकरी
डॉ. मुकुट हे मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे एचओडी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची रुग्णसेवा अव्याहतपणे सुरु आहे. सुषमा स्वराज यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. ‘गेल्या तीस वर्षांपासून मेहनत आणि प्रामाणिकपणे मी काम करत आहे. त्यामुळे एखादा मानाचा पुरस्कार प्राप्त होईल, अशी आशा मला होतीच. या सन्मानासाठी मला योग्य समजल्याबद्दल केंद्र सरकार आणि ओदिशा सरकारचे आभार’ अशा भावना डॉ. मिंझ यांनी व्यक्त केल्या आहेत.
