Breaking News

नागपूर महापालिकेत मोठ्या घोटाळ्यांचा शिवसेनेचा आरोप

नागपूर, दि. 30 - शिवसेना भाजप वादाचा दुसरा अंक नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपूर महापालिकेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.  महापालिकेतील घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सेनेनं पुस्तिकाही छापली आहे. मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारी ही पुस्तिका उद्या जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेसाठी सेना-भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच मुंबई महापालिकेत मोठे घोटाळे  झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. याला प्रत्यूत्तर देण्यासाठी भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत मोठे घोटाळे झाल्याचा आरोप करत  शिवसेनेनं एक पुस्तिकाच छापली आहे. ही पुस्तिका उद्या नागपुरात प्रसिद्ध करण्यात येईल.
महापालिकेचे प्रमुख आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीच्यावर आयुक्त आणि  नगरविकास विभाग असून या विभागाचे प्रमुख मुंख्यमंत्री आहे. तर महापालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्याला जबाबदार कोण, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं,  अशी मागणी शिवसेनेने काल केली होती.