Breaking News

जलिकट्टूसाठी रहमान, अश्‍विन, विश्‍वनाथन मैदानात

चेन्नई, दि. 20 - जलीकट्टू बंदीविरोधात आज संपूर्ण तामिळनाडू एकवटलं आहे. जलिकट्टू या पारंपारिक खेळाला परवानगी मिळावी, यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी आवाज उठवला आहे. त्यासाठी आज तामिळनाडू बंदची हाक देण्यात आली आहे. चेन्नईच्या मरिना बीचवर हजारोंच्या संख्येने नागरिक जमले असून, त्यांनी जलिकट्टूला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
तामिळनाडूतील प्रसिद्ध ‘जलीकट्टू’ या पारंपारिक खेळावर सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये बंदी घातली आहे. पण मोदी सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती. मात्र कोर्टाने पुन्हा आपली बंदी कायम ठेवत सरकारला झटका दिला. मात्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, पुन्हा ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर अभिनेता कमल हसनपासून, संगीतकार ए आर रहमान, विख्यात बुद्धीबळपटू विश्‍वनाथन आनंद, आर अश्‍विन, श्री श्री रवीशंकर यांनी जलिकट्टूचं समर्थन केलं आहे.