Breaking News

बीडमधील गेवराईच्या भाजप आमदारावर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

बीड, दि. 20 - गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढताना झालेल्या वादानंतर त्यांच्यावर गेवराईतील अमन सुतार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढताना खुद्द आमदारांनी हस्तक्षेप केला. त्यादरम्यान उपस्थित जमाव आणि पवार यांच्यामध्ये वाद झाला. विशेष म्हणजे गेवराई नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. अमन सुतार यांच्या तक्रारीवरुन विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता ही घटना घडली असून रात्री 9 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.