Breaking News

पंकजा मुंडेंच्या सभेत स्टेज कोसळलं

औरंगाबाद, दि. 29 -  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत स्टेज कोसळल्याने खळबळ उडाली. औरंगाबादेतील  वैजापूर तालुक्यातील महलगांव इथं पंकजा मुंडेंची सभा सुरु होती. त्यावेळी स्टेजवर गर्दी वाढल्याने स्टेज कोसळलं. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे. या  प्रकारानंतर काहीशी रखडलेली सभा, पुन्हा एकदा सुरु झाली.