Breaking News

मुंबईसाठी भाजपची मित्रपक्षांसोबत वाटाघाटी सुरु

मुंबई, दि. 28 - शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मित्र पक्षांबरोबर वाटाघाटी सुरु झाली आहे. शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर मित्रपक्षांची समजूत काढण्यास भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.
जागा वाटपासंदर्भात मुंबईतील रंगशारदा सभागृहात भाजप आणि मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार, रिपाइंकडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे तर महादेव जानकर यांच्याकडून रासपचे पदाधिकारी उपस्थित होते. मित्रपक्षांनी भाजपच्याच चिन्हावर लढण्याचा आग्रह भाजप नेत्यांनी केला आहे. तर भाजपच्या चिन्हावर लढणार नसल्याची भूमिका रिपाइंने घेतली आहे. इतर मित्रपक्ष दोन दिवसात भूमिका जाहीर करणार आहेत.