Breaking News

इन्फोसिसनं 9000 कर्मचार्‍यांना घरी पाठवलं!

बंगळुरु, दि. 20 - प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसनं आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केलं आहे. मागील एक वर्षापासून कर्माचार्‍यांची कपात इन्फोसिसकडून केली जात असल्याचं कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्यानं 2 हजार कर्मचार्‍यांना कमी करत आतापर्यंत 8000 ते 9000 कर्मचार्‍यांना कमी करण्यात आलं आहे. तसंच कमी करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांना नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष ट्रेनिंगही देण्यात येत आहे, असं कृष्णमूर्ती यांनी सांगितलं आहे. 2015 साली कंपनीचे एचआर म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या शंकर यांनी ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच सध्या नोकरभरतीही थांबवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
मागील 9 महिन्यात 5,700 कर्मचार्‍यांना इन्फोसिसनं कमी केलं असून अजून जवळपास 2500 कर्मचार्‍यांना पुढील काही दिवसात कमी केलं जाईल. मागच्या वर्षी ऑटोमेशनमुळे याच कालावधीत जवळपास 17000 कर्मचार्‍यांना कमी करण्यात आलं होतं.