स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, 9 तरुणींसह 3 ग्राहक ताब्यात
गुरुग्राम, दि. 22 - गुरुग्राममध्ये सेक्स रॅकेट चालवणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांनी या कारवाईत 9 तरुणींसह तीन ग्रहकांना ताब्यात घेतले आहे. गुरुग्रामच्या सहारा मॉलमध्ये क्वीन स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून तरुणी आणि ग्राहकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या तरुणी आणि ग्राहकांची चौकशी केली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वारंवार गुरुग्राममध्ये सेक्स रॅकेटची प्रकरणं उघडकीस होत आहेत. त्यामुळे पोलिसांचीही चिंता वाढली आहे. गुरुग्रामची बदनामी होऊ नये आणि त्यासाठी सेक्स रॅकेटसारखी कृत्य थांबवावी म्हणून पोलिस प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून सेक्स रॅकेट प्रकरणांचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला आहे.