पाकला 2019 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरणंही कठीण
दुबई, दि. 28 - पाकिस्तानला 2019 च्या आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी थेट पात्र होणं अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. संघाची सततची खराब कामगिरी यामागचं कारण आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसीच्या आकडेवारीनुसार पाकिस्तान सध्या 89 गुणांसह दोन अंकांनी बांगलादेशच्या मागे आहे, तर दोन अंकांनी वेस्ट इंडिजच्या पुढे आहे. यजमान इंग्लंडशिवाय 30 सप्टेंबर 2017 पर्यंत आयसीसीच्या वन डे क्रमवारीतील टॉप 7 संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. पाकिस्तान संघ विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी गुणांची कमाई करण्यास अपयशी ठरला आहे. शिवाय संघाच्या क्रमवारीतही काही खास बदल झालेले नाहीत, असं आयसीसीने म्हटलं आहे.
पाकिस्तान फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमीरातमध्ये (यूएई) बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-ट्वेंटी सामना खेळणार आहे. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तान वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि दोन टी-ट्वेंटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना करायचा आहे. पाकिस्तानला नुकत्याच खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-4 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येत्या काळात बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवणं पाकिस्तानला गरजेचं असेल. टीम इंडिया सध्या 112 गुणांसह आयसीसीच्या वन डे क्रमवारीत तिसर्या स्थानी विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया 120 गुणांसह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका 116 गुणांसह दुसर्या स्थानी कायम आहे.