Breaking News

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी प्रणाली लागू होणार

नवी दिल्ली, दि. 17 - वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी 1 जुलैपासून देशात लागू होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. अगोदर 1 एप्रिल 2017 पासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र केंद्र आणि राज्यांच्या विविध मागण्यांमुळे 1 जुलै रोजी जीएसटी प्रणाली देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापार्‍यांच्या कराच्या मुल्यांकनाचा अधिकार राज्याला द्यावा, अशी अनेक राज्यांची मागणी होती. यावर आजच्या  बैठकीत तोडगा काढण्यात आला. 90 टक्के कराचा अधिकार राज्याला असेल तर उर्वरित 10 टक्के कराचा अधिकार केंद्राला असेल, असं आजच्या बैठकीत स्पष्ट  करण्यात आलं.
दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापार्‍यांच्या करापैकी प्रत्येकी 50 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकारला मिळेल. जीएसटी काऊन्सिलची  शेवटची बैठक 4 जानेवारीला झाली होती. दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेले करदातने राज्यांच्या अधिकारामध्ये असावेत, अशी राज्यांची मागणी होती.