Breaking News

विवेकानंदानी विज्ञानाच्या साहाय्याने हिंदू धर्माची माहिती व महती संपूर्ण जगाला दिली ः प्रतिभा पाटील

पुणे, दि. 13 - वाकड येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्य पूना या संस्थेच्या स्थापनेस 60 वर्षे पूर्ण झाली. या हिरक महोत्सवी वर्षारंभ व स्वामी विवेकानंद जंयतीनिमित्त कॉलेज  आवारात उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार देवीसिंह शेखावत, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. एस बी मुजूमदार, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संस्थापक एन. सी. जोशी, भारती  विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजी कदम, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सुधाकर जाधवर, भारती विद्यापीठ इंटरनॅशनल अफेयर्सचे कार्यकारी संचालक  एस. एफ. पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अध्यक्ष एस के करंदीकर, इन्सिटट्यूट ऑफ सायन्सचे सचिव विठ्ठल ताम्हणकर, विश्‍वस्त अनंता झांजले, स्वामी  विवेकानंद कॉलेजच्या अध्यक्षा मंदाकिनी जोशी, विश्‍वस्त प्रसाद जोशी, विश्‍वस्त डॉ. मधुरा जोशी, प्राचार्य डॉ.श्रीराम कुलकर्णी, कुलसचिव डॉ. ओमकार गद्रे,  आयबीएमआरचे संचालक डॉ. एस एस शिंपी आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाल्या की, आज देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली असली तरी आजही जुन्या  रूढी परंपरांचा पगडा देशात दिसून येते. याविरुद्ध तरुणांना काम करावे लागणार आहे. विवेकानंदांचे विचार आत्मसात केल्यास, हे शक्य असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली कुदरे यांनी तर डॉ श्रीराम शिंपी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा वाचून दाखवला. सूत्रसंचालन प्रा. महेश देशपांडे व प्रा. रेणुका  वनारसे यांनी केले तर आभार प्रा. भाग्यश्री दुधाडे यांनी मानले.