मनसेला बालेकिल्ल्यातच धक्का, दादर विभागप्रमुख शिवसेनेत
मुंबई, दि. 26 - मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठं भगदाड पडलं आहे. मनसेचे माजी नगरसेवक आणि दादर विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’वर पाटणकरांनी मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व चांगलं आहे. मनसेमध्ये फक्त बडबड कणार्यांना संधी मिळते. पण शिवसेनेत काम करणार्यांना स्थान असतं., असे म्हणत पाटणकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटणकरांचा शिवसेना प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का आहे. शिवाय, दादर हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. मनसेचे नितीन सरदेसाई याच मतदारसंघातून आमदार होते. शिवाय, दादरमध्ये मनसेचे अनेक नगरसेवक आहेत. त्यामुळे दादरमधून पक्षाला मोठं भगदाड पडणं, हा राज ठाकरे आणि मनसेला मोठा धक्का मानला जातो आहे.