Breaking News

पाकिस्तानी सायबर आर्मीचा खळबळजनक खेळ

नागपूर, दि. 04 - एकीकडे पाकिस्तानी लष्कराने आणि दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध जमिनीवर अघोषीत युद्ध पुकारले आहे, तर दुसरीकडे आणखी एक आर्मी भारताविरुद्ध व्हर्च्युअली लढतेय. तिचे नाव आहे, पाकिस्तानी सायबर आर्मी.
एखादी घटना भरतात घडली की भारताविरोधात, व्यवस्थेविरोधात या आर्मीद्वारे शंभर दीडशे ट्विट टाकले जातात त्याला म्हणतात मग वेगवगेळ्या ठिकाणी बसलेले त्यांचे सायबर आर्मीचे एजेंट्स कामाला लागतात. त्यांना कुठलाच ट्विट बनवायचा नसतो. सर्व ट्विट्स आधीच ह्या डम्पमध्ये असतात. त्याचबरोबर पुढे काय करायचे याच्या पद्धतशीर सूचना सुद्धा ह्याच डम्पवर दिलेल्या असतात.