Breaking News

बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी तिघांना अटक

ठाणे, दि. 26 - रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. निवृत्त कार्यकारी संचालक जी.जी.बाबर, मुख्य अभियंता बी.बी.पाटील आणि अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे अशी अटक झालेल्या तिघांची नावे आहेत.
हे तिघे आज आरोपपत्र घ्यायला आले होते. त्यावेळेस कोर्टाने त्यांना अटक करण्याचा आदेश पोलिसांना दिले. अटकेनंतर या तिघांना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळगंगा धरणाचा खर्च वाढवून तब्बल 92 कोटी 63 लाख 42 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात सहा अधिकार्‍यांसह 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.