उरीमध्ये लष्करी मुख्यालयावर हल्ला, दोन जवान शहीद
श्रीनगर, दि. 18 - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला आहे.
पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्ल्याला सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यानंतर काही वेळ मुख्यालय परिसरात गोळीबार आणि स्फोटाचे आवाज सुरुच होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. तीन ते चार दहशतवादी मुख्यालयात घुसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरले.