रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात अपयशी
नवी दिल्ली, दि. 18 - मुंबईकर रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात सपशेल अपयशी ठरला. पण कौस्तुभ पवार, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, अरमान जाफर आणि आदित्य तरे या फलंदाजांच्या भक्कम खेळींमुळं मुंबईनं न्यूझीलंडवर मजबूत आघाडी घेतली. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवरील या सामन्यात न्यूझीलंडनं आपला पहिला डाव सात बाद 324 धावांवर घोषित केला होता तर मुंबईनं 1 बाद 29वरून दुसर्या दिवशी खेळाची सुरूत केली होती.
कौस्तुभ पवार आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या फलंदाजांनी शतकं साजरी केली. कौस्तुभनं 228 चेंडूंमध्ये 100 धावांची तर सूर्यकुमारनं 86 चेंडूंमध्ये 103 धावांची खेळी केली. मुंबईचा युवा फलंदाज अरमान जाफरनं 69 धावा फटकावल्या. तर रोहित शर्मा केवळ 18 धावांवर माघारी परतला. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिद्धेश लाड 86 धावांवर आणि आदित्य तरे 53 धावांवर खेळत होता. मुंबईनं दुसर्या दिवसअखेर पाच बाद 431 धावांची मजल मारली असून, न्यूझीलंडवर 107 धावांची आघाडी घेतली आहे.