Breaking News

पक्ष जे पद देईल ते स्वीकारेन : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि. 29 - मराठा मोर्चावरुन मुख्यमंत्रीपदाबाबत उलट-सुलट चर्चा सुरु असताना, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलें आहे. मी कोरें पाकीट, पाकिटावर पक्ष जो पत्ता लिहिल, तिथे जाईन, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतच्या प्रश्‍नावर उत्तर दिलें. ते कोल्हापुरात बोलत होते. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कोरे पाकीट आहे. पाकिटावर जो पत्ता देतील, तिथे जाऊ. पक्ष जी संधी देईल, ती कोणतीही जबाबदारी स्वीकारेन. मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक होण्यासही तयार आहे. तीन दिवसांपूर्वीच पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे पद धोक्यात नाही. तसेच कोणतीही चूक नसताना मुख्यमंत्री बदलण्याची संस्कृती भाजपात नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हतबल नाहीत, मराठा आरक्षणाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी त्यांनी भूमिका मांडली आहे, असेही पाटील म्हणाले होते.